आमच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र श्री गणरायाच्या आगमनासाठी सिद्ध झालाय. रात्र रात्र जागून रोषणाई, आरास याचा सुंदर मेळ साधला जातोय. लालबाग, काळाचौकी, शिवडी, परळ यासारख्या कामगार विभागामध्ये रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिकडच्या स्पर्धेच्या युगात सर्वच सार्वजनिक मंडळे श्री. गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ सादर केल्या जाणाऱ्या कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशाचे सातत्य राखण्यात प्रयत्नशिल असतात. सुबक मूर्ती, कला दिग्दर्शन, स्वच्छता, सामाजिक जाणीव, रोषणाई, राष्ट्रीय एकात्मता सारखे असे कितीतरी विषय स्पर्धांमधून राबवले जातात. .
